पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. हे येथील 'लॉर्ड वार्डन्' व ' लॉर्ड ऑफ धि सिके पोर्टस '" झाले. महाराणी हिक्टोरिया व प्रिन्स कन्सॉर्ट, यांनी येथे स्वतः येऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराणी साहेब ज्या खोलीत निजल्या होत्या, ती अद्यापि दाखविण्यांत येते. वामर येथे आनंदांत घालविलेल्या काळाबद्दल महाराणी साहेबांनी आपल्या रोजनिशीत -ल्लेख केला आहे. 'आयर्न ड्यूक मरण पावल्यावर त्यांचे प्रेत या किल्ल्यांतील, ते राहात असलेल्या दालनामध्ये थोडे दिवस दर्शनासाठी ठेविले होते. पुढे तें लंडनला नेले. तेथे त्याचा अपूर्व थाटाचा प्रेतयात्रेचा सार्वजनिक समारंभ झाला. त्या विख्यात शूर योद्ध्याचे प्रेत, ' सेंट पॉल्स क्याथेडल'मध्ये दफन होण्यासाठी मोठ्या समारंभाने नेण्यांत आले त्यावेळी, त्याचे दर्शन घेऊन, पूज्यबुद्धी व्यक्त करण्यासाठी, सारे लंडन शहर बाहेर पडले होते. येथे त्यांच्या स्मारक वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यांत त्यांचा प्रवासांत उपयोगांत आणावयाचा पलंग, ज्या खुर्चीवर त्यांचे प्राणोत्क्रमण झाले ती खुर्ची, त्यांचे लिहिण्याचे टेबल, वाटलूंच्या लढाईत त्यांनी वापरलेले ' हेल्मेट' -टोपी-,लांब बूट, व त्यांच्या मरणानंतर त्यांच्या चेह-याचा जो ठसा घेतला गेला त्याची नक्कल वगैरे आम्ही पाहिले. येथे आणखी एक विलक्षण वस्तू ठेवलेली आहे. ती पिट्ट बसत असलेली खुर्ची. तिच्यावर ते दोन्हीकडे पाय सोडून बसत असते. हात मागें खुर्चीच्या पाठीवर राहात. तेथेंच पुस्तक ठेवण्याला जागा केलेली होती. या किल्ल्याभोवती ૨૭૨