पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. त्याचा तो आजवर उपभोग घेत आहे. आठव्या हेरी राजाच्या वेळी डील, वामर व सांडविच, येथें तटबंदी किल्ले बांधविण्यांत येऊन इतःपर कोणी शत्रूने स्वारी करण्याच्या प्रयत्नाला पक्का अडथळा व्हावा, अशी तजवीज केली गेली.. सांडविच येथील किल्ल्याची तटबंदी कमी करण्यांत आली आहे. पण बाकीच्या दोन्ही किल्ल्यांची तटबंदी अद्याप कायम असून ते त्या अलौकिक धामधूमीच्या काळाचे स्मारक आहेत. सिके पोर्ट्सचे ' लॉर्ड वार्डन्. ' लॉर्ड ब्रासी, यांच्या मेहरबानगीमुळे, यापैकी मुख्य असलेला वामरचा किल्ला मला पाहण्यास सांपडला. लार्ड व लेडी ब्रासी यांनी स्वतः मोठ्या अगत्याने बरोबर येऊन, तो ऐतिहासिक किल्ला राणीसाहेबांना व मला नीट फिरून दाखविला. विल्ल्यम पिट्ट, हे 'लॉर्ड वार्डन्' असतांना, त्यांनी नेल्सनची भेट येथेच घऊन त्याच्याशी सल्ला मसलत केली होती. सुप्रसिद्ध ट्राफलगारच्या लढाई नंतर इंग्लंडच्या अप्रतिम थोर ' अमिरल'चेंनल्सनचें--पार्थिव कलेवर घेऊन परत आलेल्या 'व्हिक्टरी' नावाच्या लढाऊ गलबताने या किल्ल्या लगतच नांगर टाकला. तव्हां पिट्ट याला अतोनात दु.ख झाले. तों देखावा अतिराय करुणास्पद होता. त्याच्यामुळेच पिट्टचे मरण लौकर ओढवले, असे म्हणतात. पुढे प्रख्यात डयूक ऑफ वेलिंग्टन् २७१