पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. चैन व करमणूक, यांच्या मागे फिरणारी मंडळी जमली होती. समुद्रतीरावरील वाळवंट जमलेल्या मंडळीमुळे खरोखर सजीवसें झाले होते. अल्लड तरुण मुले, फावडी व बालट्या घेऊन, तीरावरील वाळवंटांत नेटाने खणत होती. वडीलधारे गारगोट्यांवर आळसाने आडवे पडून, आरोग्य व उल्हास प्राप्त करून देणाऱ्या मंदवायूचा आस्वाद घेत, महासागराच्या लाटांवर डौलाने चाललेल्या गलबतांचा नेहमीं बदल पावणारा देखावा गमतीने व आनंदाने पहात होते. तेथून समुद्राचा देखावा फारच विस्तीर्ण दिसत होता. -त्याच्याकडे पाहात असतांना, पूर्वकालीन शौर्य प्रर्दशनाच्या दिवसाचे, तसेंच डील व वामर यांच्याकडे या राष्ट्राच्या इतिहासामध्ये मन खळबळून सोडणारा व महत्त्वाचा जो कार्यभाग होता, त्याचे स्मरण झाल्यावांचून राहत नाही. त्यांच्याजवळच उतरून, ज्यूलियस सीझर - याने या देशाचे आक्रमण केले. त्यावेळी येथील लोकांनी त्याचे प्रेमपूर्वक स्वागत केले होते, असे सांगतात. पुढे पुष्कळ वर्षांनंतर नार्थफोर्लंडच्या पलीकडे इंग्लंडाने पहिली समुद्रांतील मोठी लढाई मारली, व फ्रेंच लोकांचा आरमारी युद्धांत कायमचा निकाल लावल्यामुळे येथून पुढे इंग्रज लोकांच्या समुद्रावरील विजयमालिकेस सुरवात झाली; आणि त्या योगानें इंग्लंड देशास सातां समुद्रावर अप्रतिहत स्वामित्व प्राप्त झाले. २७०