पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. भाग विसावा. . इंग्लंडांतील बाग.. ‘समुद्राकडे निरखीत असतांना किती तरी रम्य व सुखकारक देखावे चित्तचक्षुपुढे उभे राहून माझा पिछा पुरवितात. पूर्वीच्या साऱ्या अलौकिक कथा आणि माझी सारी स्वप्नं जणों प्रत्यक्षतः परत येतात.' लांगफेलो.' अनेक जागी पुष्कळसें फिरून, लंडनला परत आल्या. वर, आम्ही तेथील · सीझन'च्या उकाड्याचा मारा सोसला.. नंतर केंट मधील प्रशांत व रमणीय स्थळांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर, आरोग्यकारक लहरीवरून येणारी हवा खात, स्वस्थ आराम घेत राहिलो. हा फेरबदल फारच उत्साहजनक होता. केंट कौंटीला इंग्लंडांतील बाग, असें अन्वर्थक नांव मिळाले आहे. डील व वामर येथे आह्मीं दोन महिने मोठ्या आनंदांत काढले. या शहरांच्या जवळपासच्या भागांत पुष्कळसे पेनशनर आंग्लोइडियन राहतात. त्यांच्या सहवासामुळे तेथे राहण्यापासून होणाऱ्या सुखामध्ये पुष्कळ भर पडली. आमी गेल्या वेळी तेथील 'सीझन' बहारीत होता. २६८ हे दोन्ही गांव अगदी लागून-बहुतेक एकच म्हणण्यासारखे आहेत. इंग्लंडमध्ये आगस्ट महिना, साऱ्या वर्षांत सुट्टीचा व विश्रांतीचा असतो. यामुळे यावेळी तेथे बाहेर गांवाहून पुष्कळ मंडळी आली होती. तेथील देखावा उज्ज्वल व उल्हसित करणारा होता, आणि फ्रायसार्ट या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने इंग्लिश लोक ऐषआरामाचा उपभोग देखील विषण्ण वदनाने घेत असतात' अशा प्रकारची जी त्यांची निर्भसना केली आहे, त्या त्याच्या उक्तीचे वैय्यर्य येथील देखावा पाहिल्याने पूर्णपणे व्यक्त होत होते.अशा या लोकप्रिय करमणुकीच्या ठिकाणी मंदवत्तीला मुळी आसराच नव्हता, हे पाहणाज्याच्या सहज नजरेस येण्यासारखे होते.समुद्रतीरावरील सुरेखशी फरसबंदी, सुंदरसा धक्का, आराम व सुख देणारी हाटेलें, व विश्रांतिगृहे, आणि उतारबंद अशी मोकळी व मनोहर पटांगणे, या सर्व जागा सुखाने सहल करणाऱ्या मंडळीच्या गर्दीने चिकार भरून गेल्या होत्या. पुरुष मंडळीनी बारीक फ्लानेलचे उन्हाळ्यांत थंड राहणारे कपडे घातले होते, व स्त्रियांनी चटकदार पेहराव व बहुतेक सर्व रंगांच्या टोप्या घातलेल्या होत्या. मधून मधून ब्यांड वाजत होता.त्याच्या सुराच्या मजेदार लहरी कानावर पडत होत्या. त्यांच्या योगाने तेथील सार्वत्रिक आनंदामध्ये भर पडत होती. तेथे प्रत्येक जण सुखोपभोगाच्या इच्छेत मग्न झालेला होता व सुखसाधक जादूच्या मंत्रानें, काळजी अगदी हद्दपार झालेली होती.प्रशस्त राजमार्गावरील प्रत्येक बैठकीपाशी २६९ १८