पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. काढावे, ही यापेक्षाही सोईची व चांगली तजवीज होईल. यांत अर्थातच काही तरी अधिक खर्च पडेल पण तो सत्कारणी होईल. असे पेन्शनर हुद्देदार, सरकारी नोकर नसलेल्या हिंदी लोकांना खरोखरी उपयोगी पडण्याला, सरकारी नोकर मंडळीपासून पृथक् राहून, तसा हिंदी लोकांशी त्यांनी मोकळेपणी सहवास ठेविला पाहिजे. नाही तर हल्लींच्या वस्तुस्थितीत विशेष फरक पडणार नाही. हे मात्र मुख्यत्वें व स्पष्ट लक्षात ठेविले पाहिजे. सरकारी अंमलदारांचे नेतृत्व अवश्य समजून, तें मान्यही केले जाते. हिंदी लोकांना, इंग्रजांचा दाब व वळण लावणे, यांचा फायदाही कबूल आहे. तरी आपणाला सरकारी कामाकाजांत अधिकाऱ्यांच्या बरोबर सहकारितेने काम करण्याची अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांना मनापासून वाटते. तद्देशीय लोकांच्या जास्त नेमणुकी होणे, व पेनशनर युरोपियन अंमलदारांनी तिकडे जास्त दिवस किंवा कायमचें राहणे, यांच्या द्वारें हल्लीच्या स्थितीतल्या अडचणीचा बराच निकाल लावतां येण्याजोगा आहे, असे दिसते. २६७