पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वसलेल्या शहराचा देखावा फार सुरेख दिसतो. येथील वरिष्ठ वर्गातील लोकांची वस्ती शहराच्या इतर भागापासून अगदी पृथक् आहे. तिकडे जाण्याचा रस्ता एका बोगद्यांतून आहे. रस्त्यांमध्ये उंट विशेष. शिवाय, नेहमी आढळणारी गाढवें व वकरी ही दिसत होती. पोर्ट-सैद येथेही काही घंटे फुरसत मिळाली. तेवढ्यांत आह्मी शहर पाहून आलो. येथे प्रत्यक्षत: नाही तरी मनुष्य. वस्तीच्या मानाने या भूमंडळावरील जुन्या तीन्ही खंडांचा संगम होतो. मुख्य भरणा अरबांचा; तरी सर्व राष्ट्र व जाति यांचे प्रतिनिधि येथे आढळतात. प्रत्येक जातीचे गोट पृथक् आहेत. वस्ती अगदी अलीकडील दिसते. तिच्यांत प्रेक्षणीय किंवा महत्त्वाचे कांही नाही. फार तर त्याच्यावरून युरोपियन शहराच्या रचनेची ढोबळ कल्पना येण्याजोगी आहे. रस्ते रुंद आहेत. परंतु त्यांची व्यवस्था व सफाई चांगली नाही. ब्रिटिश सत्ता स्पष्ट दृष्टीस पडते. शहर वसविणे व म्युनिसिपल व्यवस्था, यांच्या संबंधाने प्राच्य रहिवाशांना युरोपियन पद्धत व धर्ती शिकविण्याची जणों पहिली तालीम दिली जात असलेली येथे दिसून येते. पण सुवेझच्या कालव्याचा उल्लेख करण्याचे वगळणे बरोबर होणार नाही. मिसर देशच्या फिरओन बादशहाच्या वेळी इजिप्शियन लोकांनी हा कालवा काढला असता—ज्यांनी