पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. हिंदुस्थानांतील अधिकारी मंडळासंबंधाची स्थिती, अगदी एकसारखी समजतां येईल. ज्ञान व अनुभव पूर्णावस्थेला पावलेल्या वृद्ध वीरांच्या लाभाला तो देश पारखा होईल. प्रत्येक राष्ट्राच्या जीवनक्रमामध्ये हे ज्ञान व हा अनुभव मोठे महत्त्वाचे भाग असतात. हल्लींच्या हिंदुस्थानाच्या राज्यकारभारामध्ये हा एक मोठा दोष आहे. __ याला उपाय सुचविणे सोपे आहे असे नाही. यरोपियन लोक तिकडे कायमचे राहण्याला हवापाण्याची अडचण व आडकाठी आहे असें ह्मणण्यांत येते. पण माझी अशी सूचनाती कदाचित् साहसाची वाटेल-आहे की, हिंदी लोकांना जबाबदारीच्या जागा अधिक देण्यांत याव्या. नोकरी आटपून पेनशन घेतल्यावर ते तिकडेच राहणार यामुळे त्यांचे ज्ञान व अनुभव, त्या देशांतच कायम राहून त्यांची राष्ट्राला उणीव भासणार नाही. आणखी पुष्कळच काळपर्यंत राज्यकारभारांत मोठासा भाग युरोपियन अंमलदारांच्याच हाती राहिला पाहिजे, हे उघड आहे. ह्मणूनच, युरोपियन अधिकारी पेन्शन घेतल्यावरही काही वर्षे तरी, तेथेच राहतील अशी योजना झाली पाहिजे. यासाठी पेन्शन घेतल्यावर अशांपैकी काही लोकांनी तरी, ज्या जिल्ह्याचा त्यांना दृढ परिचय झालेला असतो, त्याच्यांत आणखी तीनचार वर्षे राहण्याची तजवीज व्हावी. त्यांनी हिवाळ्याचे दिवस तिकडे जाऊन २६६