पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. त-हेने नोकरीच्या क्रमांतून निघून परत स्वदेशी जाते. याचा परिणाम असा होतो की, त्या देशांतून उत्तमोत्तम तयार झालेल्या मानवी बुद्धीच्या व अनुभवाच्या फायद्यास तो देश एकसारखा व सतत आंचवतो. हिंदी लोकांना सानुभव ज्ञान संपादन करून घेण्याची साधने फारच कमी आहेत. या गोष्टीला पूर्वीच्या काळी यदाकदाचित् निरुपाय असला, तथापि त्याच्या योगानें परिणत ज्ञानाचा संचय हिंदुस्थानांतून नाहीसा झालेला आहे यात शंका नाही. युरोपियन लोक स्वदेशी नोकरीचाकरी केल्यानंतर तेथेच कायम राहतात. त्याचप्रमाणे नोकरीसाठी ते ज्या परकीय देशांत जातात त्या देशांत त्यांना पेनशन् घेतल्यानंतर राहणे शक्य झाल्यास त्यांच्या नोकरीच्या मुदतीत त्यांनी मिळविलेला अनुभव व ज्ञान यांचा फायदा त्या देशांच्या कारभारांत योग्य सल्ला देण्याच्या कामी किंवा त्यास योग्य वळण लावण्याच्या कामी होण्यासारखा आहे. त्यांनी आपल्या दत्तक गेलेल्या भूमीमध्येही, नोकरी आटपल्यावर राहावे. असे झाल्याने, त्यांनी कमविलेले ज्ञान व अनुभव, तिकडे मार्गदर्शकपणा किंवा नेतत्व. यांसाठी मिळू पावतील. लोकवस्तीपैकी अमुक वय झालेल्यांना परदेशी पाठवून, लोकसमाजाची व्यवस्था तरुण व मध्यम वयाच्या लोकांच्याच हाती सोंपवावयाची, अशी व्यवस्था असलेल्या एखाद्या राज्याची कल्पना केली तर, त्याची क २६५