पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पियन कामदारांच्या अनुभवाला तो देश सर्वथैव मुकतो आहे. हिंदुस्थानांत बहुतेक वरिष्ठ प्रतीच्या जागेवर युरोपियन भरलेले आहेत. सर्व कामाकाजाचे सूत्र त्यांच्या हाती आहे. राज्यकारभाराची दिशा ठरविणे व ती अमलात आणणे या दोन्ही गोष्टी तेच करितात.हे अंमलदार हिंदुस्थानांत प्रथम पाय ठेवतात त्यावेळी त्यांची स्थिती कोशगत कीटासारखी-गर्भावस्थेचीअसते. त्यांचा नवशिकेपणा व अनुभवाची उणीव, यांपासून होणारा सर्व तोटा त्या देशास सोसावा लागतो. तेथेच त्यांना काम करण्याचे खरें शिक्षण मिळते. या ज्ञानप्राप्तीच्या पूर्वावस्थेत काही व्यक्तींचे बरेच नुकसान होते. ही गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे. एखाद्या डाक्टराच्या गोष्टी वरून हे स्पष्ट होईल. अति उत्तम शिक्षण पावलेले डाक्टर तिकडे पाठविले जातात. पण त्यांना पुर्ता अनुभव येऊन वैद्यविद्येचें पुरे ज्ञान मिळण्यासाठी, शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तेव्हां क्वचित् प्रसंगी प्राणहानी होण्याचाही संभव असतो तसेच नवीन येणारा अंमलदार इंजिनियर असला तर, अनुभवाच्या अभावीं तो मिळविण्यामध्ये चुका होऊन परिणामी द्रव्यहानी व प्रसंगी भयंकर अनर्थापात होण्याचीही भीती असते. या संबंधी तक्रारीचा मुख्य मुद्दा एवढाच की, या अंमलदारांना अनुभव येऊन, ते कामालायक झाल्यावर, ते थोडी वर्षे काम करितात न करितात तोच, ते पेन्शन घेऊन परत जातात. त्यांच्या जागी तशीच नवशिकी मंडळी येते, व तीही त्याच २६४