पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. ओल्ड स्पोर्ट-'माफी मागतों खेळाडू दोस्त-असे म्हटले. हे ड्यूक उत्तम शिकारी ह्मणून प्रसिद्ध होते. ते या प्रसंगाची हकीकत मोठ्या गमतीने व आनंदाने सांगत. ___ इंग्रज लोकांमधील ' क्लान्निश्नेस '-विविक्षित वर्गाला चिकटून राहण्याची संवय-ही त्यांच्या जीवितक्रमांतील विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट होय. स्वकीय वर्गाचा दृढाभिमान 'आंग्लोइंडियन' मंडळीमध्ये विशेषच दिसून येतो. त्यांना त्यांच्या शेजाऱ्यापेक्षा स्वत:च्या वर्गातील लोकांची बरीच अधिक माहिती असते. याचा अर्थात एका दृष्टीने उपयोग आहे. पण तुटक व अलग राहण्यांतही तोटे असतात. इंग्रज लोक व हिंदुस्थानचे रहिवाशी, यांच्या अंत: करणांत वसत असलेला सलोखा व सहकारिता, या भावना जर दृढतर करण्यांत आल्या तर त्यापासून किती तरी चांगला परिणाम होण्याचा संभव आहे, ही गोष्ट येथे नमूद केल्यावांचून राहवत नाही. आपली मते व विचार दुसऱ्याला कळविता येण्याची शक्ती, ही एक श्रेष्ठतम देणगी आहे. तिच्या संबंधाचे स्वातंत्र्य, राष्ट्राच्या सुखाचे व भरभराटीचे मूळ आहे. __इंग्लंडांतील सफरीमध्ये माझा पुष्कळचशा आंग्लोइंडियन पेन्शनर मंडळीशी सहवास घडला. त्यावरून माझ्या मनांत पूर्वीपासून घोळत असलेली कल्पना दृढतर झाली; ती ही की. हल्लीच्या स्थितीत हिंदुस्थानांत काम करून मिळविलेल्या युरो २६३