पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. प्रमाणे वर्गावर्गी अगर दर्जा, यांच्यावर आगगाडीतील सुखसोईचे मान अवलंबून ठेवलेले नसते. लंडनमध्ये जमीनी खालून मोठमोठाले नळे घालून त्यांच्यांतून रेलवे नेलेल्या आहेत. अशा आगगाडीत क्लासवारी नसून सरसकट भाडयाचा दरही एकच आकारला जातो. ब्रिटिश कामकरी मजूर-श्रृंगप्राय कठिण हात झालेला मेहनतीचा पुत्र'-सहज किंवा समजून उमजून व कदाचित् पर्वा न करतां या आगगाडींत, कोणा वरिष्ठ दर्जाच्या गृहस्थाच्या किंवा एखाद्या डयूकाच्याही शेजारी खेटून बसण्यास कमी करीत नाही. हा संयोग झणजे जणों खादी व मखमल एकत्र केल्यासारखा चमत्कारिक दिसतो. परलोकवासी डयूक ऑफ कब्रिज यांच्या हस्ते थोड्या वर्षांखालीं 'सेंट्रल लंडन टयूब रेलवे' सुरू करण्याचा समारंभ झाला. त्यांचे वर्तन अगदी साधे असे. त्यांना ऐट व मिजास मुळी ठाऊक नव्हती. ते या सर्व वर्गाच्या माणसांनी वापरण्याच्या लोकप्रिय रेलवेंतून वारंवार आवडीने प्रवास करीत असत. त्यांच्या हाती नेहमी एक भली थोरली छत्री असे. त्यावरून 'अंब्रेला ड्यूक '-छत्रीवाले डयूक असे त्यांचे नांव पडले होते. एकदां एकाचा अकस्मात् धक्का लागून ती छत्री पडली. तो निवळ कामकरी मजूर-त्याला त्यांची मुदलांत माहिती नव्हती. त्याने छत्री उचलून त्यांच्या हाती दिली व आपल्या सरावांतल्या ग्राम्य शब्दांनी 'बेग्ग येर पार्डन् , २६२