पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. * ह्यांपटन् कोर्ट'च्या राजवाड्यामध्ये राहण्याची सोय करून देऊन, त्यांचा बहुमान केला. तेथेच त्यांनी आपलें बाकीचे आयुष्य सुखाने घालविलें. खेळकरमणुकीच्या सबंधांत देखील इंग्लंड व हिंदुस्थान या दोन देशांची तुलना केली असतां दुसरा देश हाच पहिल्यापेक्षा कमी प्रतीचा ठरतो. हिंदुस्थानांत एखादा 'जिमखाना'क्रीडाभुवन-स्थापन करून त्या ठिकाणी खेळ खेळण्याची व्यवस्था करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या लोकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असते. आणि तेथे बराचसा खर्च करून देखील काही मर्यादित खेळ खेळण्याची सोय होते. इकडे इंग्लंडांत, व्यायाम करण्याचे व इतरही पुष्कळ क्लब आहेत. त्यांचे मेंबर पुष्कळ असतात. यामुळे अगदी थोड्या खर्चात हवे तितके डाव खेळून व्यायाम करण्याला सांपडते.. - इंग्रज लोक सामान्यत: ज्या ऐषआरामाचा उपभोग घेतात, तो सर्वत्र उघड दृष्टीस पडतो. इकडील साधारण प्रतीच्या सुद्धां लोकांचे कपडे, हिंदुस्थानांतील सुखवस्तू लोकांच्या कपड्यांइतके चांगले असतात. येथल्यापेक्षां तिकडे कापड किती तरी महाग व हलक्या प्रतीचे असते.तसेंच इकडे पुष्कळच सोईवार व आरामांत प्रवास करता येतो. इकडील आगगाड्यांतला तिसरा क्लास, तिकडच्या पहिल्या क्लासासारखा असतो. इकडे 0 सर्वच उतारूंच्या सुखसोईंकडे लक्ष पुरवितात. तिकडल्या २६१