पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Than माझा विलायतेचा प्रवास. आहे. सार्वजनिक पुस्तकालये बहुत करून प्रत्येक गांवांत असतात. त्यांचा उपयोग, श्रीमंत गरीब, सर्व लोकांना सारखा मोफत करून घेता येतो. त्यांच्या पासून जसा वाङ्मयात्मक तद्वतच शिक्षणविषयक फायदा करून घेण्याची साधने, यांपैकी अनेक पुस्तकालयांत उपलब्ध असतात.कारण, हिवाळ्याच्या दिवसांत तेथे शास्त्रीय व इतर विषयांवर, साधारण लोकांनाही सहज समजतील, अशी व्याख्याने होतात. साऱ्या जगांतील अत्युत्तम पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांपैकी शिरोरत्न अशा मिचेल फाराडे याच्या उदाहरणावरून अशा प्रकारच्या व्याख्यानांची उपयुक्तता किती आहे याची पुरी कल्पना होते. तो एका सामान्य लोहाराचा मुलगा. शास्त्रीय उपयोगाची यंत्रे बनविण्याच्या कामी, त्याच्या उपजत कल्पकपणाचा बराच विकास झाला होता. एका मित्राच्या मेहरबानगीमुळे, त्याला 'रॉयल इन्स्टीटयूशन' मध्ये होणारे सर हफ्री डेव्ही यांचे व्याख्यान ऐकण्याची संधि मिळाली. कोळशाच्या खाणींत उपयोगांत आणीत असलेल्या दिव्याचा शोध लावला, तो यांनीच. या लोहाराच्या तरुण मुलाने, त्या व्याख्यानाचे टांचण लिहिलेले पाहून, सर हफ्री डेव्ही साहेब इतके प्रसन्न झाले की, त्यांनी त्याला आपल्या प्रयोगशाळेत मदतगार नेमिलें. शेवटी त्यांच्या पश्चात् , सार्वजनिक व्याख्याने देण्याच्या कामावर फाराडेची नेमणूक केली गेली. त्यांची पुढे साऱ्या जगांत प्रसिद्धी झाली. परलोकवासी महाराणी व्हिक्टोरिया, यांनी, त्यांना