पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जी पवक्रम. टीच टीचभर जागासुद्धा उपयोगांत आणून, तिच्यापासून मालक स्वतःचा फायदा करून घेत असतो. शिवाय ह्यामुळे त्यांस सूक्ष्मानरीक्षण, उद्योगीपणा, व काटकसर, यांचे चांगलेंच शिक्षण मिळते; आणि ते उपयोगी व हुषार नागरिक बनतात. अगदीच लहान बगीच्याचे तुकडे असतील तेथे सुद्धा जी तन्हत-हेची पिके घेतली जातात ती पाहून मन आश्चर्य चकित होते. बहुतेक प्रत्येक जातीची फळफळावळ, भाजीपाला । व फुलें, तसेंच ‘बेरीज'–बोरीच्या जातीची लहान लहान फळे-पैदा करितात. त्यांच्यांत प्रत्येक जातीची रोपें क्वचित् प्रसंगी नमून्यादाखल अगदी मोजून लावलेली आढळतात. . इंग्लंडांत बहुतेक खेडीपाडी व शहरे यांच्यांत प्रतिवर्षी फुलांची प्रदर्शने होतात. तेथे उत्तम बगीचे ठेवणाऱ्यांना व अव्वल प्रतीची फुले, फळे व भाजीपाले, यांचे स्थानिक नमूने आणणाऱ्यांना, नगदी इनामें देतात. यामुळे त्यांच्या पैदासीला उत्तेजन मिळते. ही फुले तयार करण्याचा शोक मानसिक उन्नति करणारा असून तो मनुष्यमात्राला मिळणाऱ्या सुखसमाधानांपैकी उत्तमोत्तम व शुद्ध असा आनंद होय, असें इंग्लंडांतील थोर तत्त्ववेत्ता बेकन याने लिहिले आहे. त्याच्याबरोबरच, इंग्लंड देशाच्या थोरवीचा पक्का पाया में स्वगृहप्रेम, त्याचीही चांगली अभिवृद्धि होते. ज्ञानसंपादन व त्याचे वर्धन, यांविषयींच्या सवलतीमध्येही. इंग्रज लोकांची स्थिती, हिंदी लोकांच्या पेक्षा अधिक चांगली २५९