पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. येथूनतथून अत्यंत उष्ण आहे, अशी इकडील लोकांची सर्वसामान्य समजूत आहे.पण तेथें खुद्द इंग्लंडांतल्यासारखें हवापाणी असलेलही काही प्रांत आहेत, हे त्यांना माहित नाही.और्ध्वदेहिक चालीरीतींमध्येही पुष्कळच फरक आहे. कोठे त्यांच्यांत उत्सवासारख्या प्रकाराचा समावेश होतो, तर काही भागांत वर्षवर्षभर सुतक पाळण्याचा प्रघात आहे. कांहीं जातींत. प्रेताचे दहन करितात, तर दुसऱ्या बऱ्याच लोकांमध्ये ती पुरतात. अशामुळे हिंदुस्थानाविषयीं भलत्याच कल्पनांचा सामान्यतः सर्व इंग्रज लोकांमध्ये फैलाव होणे किती साहजिक आहे, ते लक्षात येईल. इंग्लिश बागबगीच्यांचे सौंदर्य माझ्या विशेषतः मनांत भरले. हिंदुस्थानांत एखाद्या साहेबाला आपला बाग चांगल्या स्थितीत ठेवण्याचा झाल्यास पुष्कळ खर्च करावा लागतो आणि येवढा मोठा खर्च सोसूनही पाण्याची टंचाई व पावसाची अनिश्चितता यांच्यामुळे त्यास या बागेला तितके चांगले स्वरूप आणतां येत नाही. परंतु इंग्लंडमध्ये तितक्याच स्वरूपाची बाग तयार करण्यास तिकडच्यापेक्षां पुष्कळच कमी खर्च येतो. सृष्टिदेवतेची इकडे चांगलीच कृपा आहे. यामुळे प्रत्येकाला बहुधा लहान मोठा टुमदार बगीचा तयार करता येतो. त्याच्यांत फळे, फुलें, व भाजीपाला पुष्कळच पैदा करितात. बऱ्याच ठिकाणी कोंबडी, बदकें, ही पोसून तयार करितात. २५८