पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. 'याठ पुरवावी लागत असल्यामुळे ती फारच कष्टप्रद असते. उन्हाळ्यांत त्यांना जंगलांत चारा मुबलक मिळतो तेव्हां ही हरणे साया रानांत चरत फिरत राहतात. हिवाळ्यांत ती -शखणदारांच्या झोपड्यांजवळ येतात. तेथे त्यांना दररोज चारा घातला जातो. इंग्लंडांत हरणे मूळ रोमन लोकांनी नेली, असें ह्मणतात. पण त्यांचे ‘फॉसिल्स'-अश्मीभूत अस्थीचे अवशेष-कोठे कोठे आढळून आल्याचे उल्लेख आहेत. त्यावरून ती इकडे त्यांच्या पूर्वी युगांची युगें होती, असे दिसून येते. __ इंग्लंडांतील किती तरी कुटुंबांचा हिंदुस्थानाशी निकट संबंध आहे, हे आश्चर्य वाटण्याजोगे आहे. जिकडे जावें तिकडे, स्वतः हिंदुस्थानांत जाऊन आलेले, किंवा आप्तइष्ट व स्नेही, तिकडे असलेले लोक आढळतात. असे असूनही त्यांच्या ताब्यांतील त्या देशाविषयी त्यांना पुरी माहिती नसावी, ही फारच आश्चर्याची गोष्ट होय. सामान्यतः हिंदुस्थान एक स्वतंत्र खंड आहे, त्याच्यांत अनेक निरनिराळ्या राष्ट्रजाति असून तेथील हवापाण्यांत जागजागी पुष्कळच फरक आहे, तसेच रीतीरिवाजही निरनिराळ्या प्रकारचे आहेत, या गोष्टींची त्यांना कल्पनाच होत नाही; आणि यामुळे त्याच्या एका भागाविषयींचे विधान दुसऱ्याला लागू पडणार नाही, याचे त्यांना स्मरण राहत नाही. उदाहरणार्थ, हिंदुस्थानची हवा २५७