पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समुद्रातील सफर. जातींच्या लोकांचे पुष्कळसे लहान लहान बाजार आहेत. ते पाहून मला मौज वाटली. तेथें कांहीं हिंदी वस्ती आहे; अरबस्थानचा किनारा व आफ्रिका खंडांत वसाहत करणाऱ्या जातींचे लोक व बरेचसे युरोपियन लोकही आहेत. हे मुंबई सरकारचे अखेरचे दूरचे ठाणे आहे. त्यामुळे तेथे आम्हांला कांहीं अगदीच परक्यासारखे वाटले नाही. तेथील लोकांना हिंदुस्थानी भाषा समजते. थोडेसे मराठी बोलणारे नोकर लोकही आम्हांला आढळले. मे. रोसडेंट साहेबांनी कृपा करून आपली मोटार वापरण्यास दिल्याने आमांला मिळालेल्या फुरसतींतही मुख्य मुख्य स्थळे पाहून व थोडेसे जिन्नस खरेदी करूनही परत येण्याला सवड झाली. माझे जुने स्नेही मुंबईच्या. पोलिटिकल खात्यांतील क्याप्टन रेली यांची माझी येथे भेट झाली. मला नेण्यासाठी ते सामोरे आले व त्यांनी मला पुढील युरोपांतील सफरीसंबंधी बरीच उपयोगी व महत्त्वाची माहिती व सल्ला दिली. एडनला मजबूत तटबंदी आहे. पण पूर्वेकडे जाण्याचे द्वार या नात्याने त्याचे जे लष्करी महत्त्व आहे, त्या दृष्टीने पाहिले असतांना ही तटबंदी जितकी मजबूत असणे इष्ट आहे तितकी ती नाही, असे म्हणतात. किल्ले, तटबंदी व त्यांवरील तोफा पलीकडील टेकड्यांमध्ये गुप्तशा आहेत. त्या पाहून येण्याला वेळ नव्हता. टेकडीच्या माथ्यावरून किनाऱ्याचा व दरीमध्ये