पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. तेव्हां त्यांच्यावर बंदुका झाडून त्यांची शिकार करितात. या कामी कुत्र्यांचाही पुष्कळ उपयोग करितात. त्या कुत्र्यांना 'पाइंटर' म्हणतात. ते वासावर पांखरांचा सुगावा काढून, त्यांचे ठिकाण शिकाऱ्यांना दाखवितात. या कामी त्यांना शिकवून तयार केलेले असते. . 'स्टॅग 'ची शिकार मुख्यत्वें स्कॉटलंड व इंग्लंडांतील थोड्याशाच जंगली प्रदेशामध्ये करण्यास सांपडते. हे 'स्टॅगस्' काळवीटा सारखेच दिसतात. त्यांना गाडीत बंद करून, नेमलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी व खुणेवर बाहेर सोडतात. शिकार करणारे घोड्यावर स्वार होऊन, शिकारी कुत्र्यांच्या जोड्या बरोबर घेऊन, त्यांच्या मागें धांवतात. ते थकून जमीनदोस्त होई तो कधी कधी २९।३० मैलांची दौड करावी लागते. स्काटलंडच्या 'हायलंड्स' मध्ये, विस्तीर्ण जंगली माळराने पुष्कळ आहेत. त्यांच्यांत शिकारी साठी हरणे राखून ठेवतात. अशा प्रकारचे सर्वांत मोठे जंगल एक लक्ष एकरांचे व सर्वांत लहान मटले ह्मणजे त्याच्या एकदशांश विस्ताराचे असते. हरणाची शिकार करण्याकरितां स्कॉटलंड मध्ये लहानमोठ्या डोंगरांच्या रांगांची चढउतर करावी लागते म्हणून या कामासाठी. तट्टांचा उपयोग करतात. ती तट्टे फारच मजबूत व पायांची पक्की असतात. या शिकारीमध्ये चलाख व चपल हरणांची २५६