पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. या खेळांत फारच अंगमेहनत पडते, आणि म्हणून ही करमणूक लाभत नाही याबद्दल त्यांना तितकें वाईटही वाटत नसावें. उलट पक्षी या वरील करमणुकींच्या साधनांची उणीव भरून काढणारी अशी दुसरी अनेक प्रकारची शिकार करण्याची साधने त्यांना इकडे उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, 'स्टंग'-एक प्रकारचा काळवीट,-कोल्हा, व हरीण यांची घोड्यावरून पारध करणे, आणि ससे, 'ग्राऊज' व 'कृकण' पक्षी व कवडे यांची बंदुकीने शिकार करणे, तसेच 'सामन' वगैरे माशांना गळ घालणे, या गोष्टी त्यांना येथे साध्य असतात. ___ आह्मी स्कॉटलंडमध्ये असतांना तिकडील काही 'ग्राउज' पक्षी -राहण्याच्या दलदलीच्या जागा पाहिल्या. त्यांच्यांत ज्याला आपण 'शूटिंग बॉक्सेस्'(शिकार करण्याचे माळे) ह्मणतो, ते पुष्कळ वेळां ठराविक मुदतीने भाड्याने देत असतात.सद्गृहस्थ शिकारीच्या पार्टी देतात व त्या प्रसंगी आपल्या मित्रमंडळींना निमंत्रणे 'पाठवितात; आणि खुद्द राजेसाहेब देखील कृपाळू होऊन काही मंडळीच्या निमंत्रणाचा स्वीकार करतात. शहानशहा हे वडिलाप्रमाणेच उत्तम निशाण मारणारे आहेत.ग्राउज, कृकण, कवडे अशा प्रकारच्या पाखरांची शिकार अमुकच दिवसांत करावी असे कायद्याने ठरविलेले आहे. ही शिकार करतेवेळी बंदकवाल्यांच्या पुढे, झाडांझुडपांतून पांखरें उठविण्यासाठी, हांका करणारे लोक जातात.उठविलेली पांखरें चोहीकडे उड़ लागतात २५५