पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. तें बऱ्याच दूर अंतरावरच्या विहिरीतून शेंदून भरून घरी न्यावें लागते. घरखर्चास लागणाऱ्या इतर वस्तूही इंग्लंडांत हिंदुस्थानांतल्यापक्षां सहज व सोईवार मिळतात. दूध, लोणी, भाजी, वगैरे घरोघर आणून पोहोंचवितात. ग्यासाचे आणि विजेचे दिवे तात्काळ लावता येतील अशा तजविजीने घरांत बसविलेले असतात. या सर्व सोईमुळे गृहकृत्यांचा बोजा किती तरी हलका होतो. नोकर कमी असले तरी, ते विशेष नीटनेटके व टापटिपीने काम करणारे असतात. हिंदुस्थानांतील वीस नोकरांपेक्षां इंग्लंडांत पांच सहा किंवा त्याहूनही कमी नोकर जास्त मेहनतीने व पुष्कळच अधिक काम देतात. ___मोठ्या सावजांची शिकार या एका बाबतीत मात्र आंग्लोइंडियन लोकांना हिंदुस्थानांतल्यापेक्षा, विलायतेंत अधिक उणीव असते. इकडे अशा शिकारीच्या करमणुकीचे साधनच कमी. जी काही शिकार आहे ती फार खर्चाची; इतकी की, अव्वल दर्जाच्या श्रीमान् लोकांनाच आपले कोड पुरविणे शक्य असते. 'पोलो' हा खेळ खेळण्याची सोयही त्यांना इकडे तितक्या सुलभपणाने करता येणे शक्य नाही. 'रॉनेला कब माया नचित ठिकाणी मात्र या खेळाची तरतूद केलेली आहे. पण ते लोक पेन्शन घेतात तोपावेतो, बहुशः त्यांच्यामध्ये या खेळाविषयी तितकी आतुरता व आस्थाही राहात नाही, कारण २५४