पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. तिला एखाद्या लोकप्रिय महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 'ऑस्काट्' येथील शर्यतीचा समारंभ सर्वांत जास्ती भपकेदार व थाटाचा होतो. पण तो वरिष्ठ दर्जाचे लोक व निवडक मंडळी, यांच्या पुरताच असतो. या शर्यतीच्या प्रसंगी जॉर्ज बादशहा व महाराज्ञी मेरी, राजकीय शिष्टाचाराचे निबंध बाजूला ठेवून आपल्या मित्रमंडळीशी मोकळेपणी गप्पा गोष्टी करीत असल्याचे पाहून मला फार संतोष वाटला. या प्रसंगी शहानशहा खऱ्या नमूनेदार इंग्लिश सभ्य गृहस्थाप्रमाणे वागत होते. हीच तन्हा त्यांच्या परमप्रिय पित्याचीकिंग एडवर्ड यांची ही असे. त्यावरून सर्व लोकांकडून, त्यांना मोठ्या प्रेमाने, साऱ्या युरोपांतील 'अव्वल व अप्रतिम दर्जाचे सभ्य गृहस्थ' असें नामाभिधान मिळालेले होते. ___ इंग्रज लोकांची राहणी, सुखकारक सोई व आराम यांचे मान आमच्यापेक्षा सर्व रीतीने वरिष्ठ प्रतीचे आहे. त्यांच्या सामान्य घरांमध्ये सुद्धां जी स्नानागाराची सोय असते, तशी हिंदुस्थानांत कालांतरी सुद्धा प्राप्त होण्याची आशा नाही. आरोग्याचे मुख्य साधन-शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा-तो इकडे मनमुराद' असतो. घरोघर पाण्याचे नळ असतात. हवे तेव्हां चावी फिरवितांच, राहण्याच्या व स्नानाच्या कोठड्यांमध्ये पाणी तयार. या सोईचा उपयोग, फायदा व महत्त्व, हिंदुस्थानांतील लोकांच्या तेव्हांच ध्यानात येईल. तिकडे मोठाल्या शहरांशिवाय हवे तेव्हां पाणी मिळण्याची सोय मुळीच नसते. २५३ १७