पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. हिंदुस्थानांतून परत आलेल्या बऱ्याच आग्लो इंडियन लोकांच्या घरी जाऊन, त्यांच्या मुलाखाती घेण्याचे मला प्रसंग आले. तेव्हां ते हिंदुस्थानांतल्याही पेक्षा जास्त सुखसमाधानांत रहात असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यांच्यांतील कांहीं, सुरेखशा आवारांमध्ये आरामशीर व मनोरम अशा स्वत:च्या घरांमध्ये राहतात. त्यांनी घरची जोडी व गाडी किंवा मोटारही ठेवलेल्या आहेत. इतपत थाटानें न राहता येणारे लोकसुद्धां चांगल्या मोठ्याशा गांवांत राहतात. तेथे त्यांना गाडी व नोकर यांच्यापासून प्राप्त होणारी सर्व सुखें व सोई मिळतात. इंग्लंडांतील एखादा कामकरीसद्धां हिंदुस्थानांतील सुखवस्तू गृहस्थापेक्षां खरोखर जास्त सुखांत व आरामांत राहात असतो, असे दिसते. त्याचे राहते घर चांगले पक्के विटांचे किंवा दगडांचे बांधलेले असते. त्याच्यांत सोईस्कर व आरामदायक, राहण्याच्या व निजण्याच्या, पृथक् पृथक खोल्या असतात. आटपशीर स्वयंपाकघर व पलीकडे जवळच काम करण्यास सोईची व उपयोगी अशी भांडी वगैरे ठेवण्याची कोठी असते. आणि या सर्व जागेतील व्यवस्था व टापटीप फार स्वच्छतेची व नीटनेटकी असल्याचे दिसून येते. इंग्रज लोकांचे क्लब हिंदुस्थानांत घाटावरील साहेब लोकांच्या क्लबांपेक्षा चांगले असतात. त्यांच्यामध्ये · इव्हिनिंग पार्टीज । च 'डिनर पार्टीज,' सायंकाळचे सम्मेलन व मेजवान्या-होतात. तसेंच तेथें । गोल्फ' आणि ' टेनिस ' चे खळ चालतात. २५१