पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. सामान्यजनसमूहाला 'क्रिकेट ' व ' फुटबॉल ' हे खेळ अधिक आवडतात. वरिष्ठ प्रतीचे सधन लोक आणि सुखवस्तू मंडळी, यांचा मुख्य करमणुकीचा खेळ गोल्फ. तो खेळण्याची पुष्कळशी लिंक्स'-मैदानें–फारच सुरेख आहेत. इकडे — टेनिस ' आमच्या देशांतल्या इतकें जलद खेळत नाहीत. कारण, आमच्या इकडे जमीन सूर्याच्या तापानें कठीण होते. समुद्र व नद्या, यांच्यामध्ये वोटीत बसून वल्हवीत फिरून येण्याचीही सोय असते. ही करमणूक 'युनिव्हर्सिटयां'मध्ये तर विशिष्ट महत्त्वाची मानली जाते. ' आक्सफर्ड' व 'केंब्रिज' येथील विश्वविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या दरम्यान दरसाल टेम्स नदीवर बोटींचा सामना होत असतो, तो माझ्या पाहण्यांत आला. इंग्लंडमध्ये प्रतिवर्षी जे सार्वलौकिक करमणुकीचे खेळ होतात त्यांपैकी हा बोटींचा सामना फारच लोकप्रिय झालेला आहे.इंग्लिश शिक्षणक्रमामध्ये खेळकरमणूक हा एक पुष्कळच महत्त्वाचा भाग मानला जातो.प्रत्येक शाळेला स्वतंत्र खेळण्याची जागा जोडलेली असते.प्रतापशाली डयूक ऑफ वेलिंगटन् यांनी 'वाटळूची लढाई ईटन् येथील खेळाच्या मैदानांत जिंकली गेली,' असें झटलेले प्रसिद्ध आहे. त्याच्यावरून, शारीर शिक्षण व त्याचा अभ्यास, यांची योग्यता व प्रौढी किती समजली जाते, तें सिद्ध होते. शर्यतीमध्ये सर्व प्रतीचे लोक, भारी आतुरतेने रममाण होतात. 'डार्बी'ची शर्यत सर्वांत अधिक लोकप्रिय असून २५२