पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग एकोणिसावा. इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील जीवनक्रम. हिंदुस्थानांत मोठमोठ्या हुद्दयाच्या जागेवर इंग्रज लोक जातात ते, आपल्या घरी ज्या त-हेने राहतात व सुखसोईचा उपभोग घेतात, त्यापेक्षां तिकडे फारच जास्त मिजासीने व श्रीमंती डौलाने राहतात, अशी तिकडील लोकांची सार्वत्रिक समजूत असलेली दिसते. अधिकाराची बडेजाव व जाणीव यांविषयीं हा समज अंशतः खरा असला तरी, संसारांत नित्याच्या राहणीचे खरे सुख व सोई, यांच्या संबंधाने पाहतां, फाजील ऐषआरामाविषयींची समज निवळ काल्पनिक आहे, असें कबल करावे लागते. इकडे त्यांना घोड्याच्या जोडीची गाडी व पांच चौकड्या नोकर, ठेवता येणे शक्य नसेल. पण हिंदुस्थानांतील एखाद्या जिल्ह्याचा अधिपति या नात्याने त्यांना जे ऐषआराम अनुभविण्यास सांपडतात त्यापेक्षा त्यांना आपल्या मातृभूमीत किती तरी अधिक सुख व इतर संसाराच्या पुष्कळशा सोई सहजगत्या प्राप्त होतात. २५०