पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आगबोटीत असलेल्या युरोपियन सोबत्यांच्या दृष्टीने ती सर्व नेहमींच्या सरावांतली व अवश्यमेव लागणारी, अतएव विशेष महत्त्वाची नव्हेत, अशी ते समजत हे उघड दिसत होते.. उदाहरणार्थ एडनच घ्या. माझ्या बरोबरच्या मित्रमंडळीपैकी बहुतेकांची एडन म्हणजे उष्ण ठिकाणांपैकी एक होय, यापेक्षा अधिक काही कल्पना असेल असे मला वाटत नाही. एकोणीस शतकांमागें रोमन राष्ट्राचा तेथें अंमल होता, हे त्यांच्यांतील कितीकांना माहित असेल कोण जाणे ! केप आफ् गुड होप ओलांडून, हिंदुस्थानाला सरळ गलबतांतून येण्याचा मार्ग पोर्तुगीज लोकांनी शोधून काढला तोंवर, एशियाखंडांतील व्यापाराचे जिन्नस पश्चिमेस युरोपखंडभर फैलावण्याची मुख्य उतारपेठ, या नात्याने हे मोठे बंदर होते, या गोष्टीची कदाचित् लोकांना जास्त माहिती असावी. तेथें आगबोट कांही घंटे थांबावयाची होती. त्या अवकाशांत किनाऱ्यावर जाऊन, पोलिटिकल रेसिडेंट ( मेजर जनरल सर जेम्स् ए. बेल्ल) व इतर कांहीं बड्या अधिकाऱ्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि शहरांतूनही फिरून आलों, व पाणी साठवून ठेवण्याची प्राचीन चिरेबंदी टांकी-सुप्रसिद्ध व शहाण्या सालोमन राजाने बांधलेली म्हणतात तीही पाहून आलो. - हे शहर एका बंद पडलेल्या ज्वालामुखीच्या मुखावर वसलेलें आहे व ते दिसण्यांत फार रूक्ष आहे. तेथे निरनिराळ्या