पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पाण्यांत स्थळपरत्वे फरक पडतो. आम्ही पाहिलेला त्याचा भाग ब्रिटिश बेटांतील इतर बऱ्याच भागांच्या मानाने तितका संपन्न किंवा भरभराटाची दिसला नाही. गांव व घरें गरीबीची व कमी दर्जाची होती. नित्यक्रम, राहणी व परिस्थिती, ही सर्वसाधारणपणे काहीशी उदासवाणी वाटली. • कार्व्हिन् ' किल्ल्याचा बराच चांगला देखावा पाहण्यास सांपडला. तेथेच हल्लींचे शहाजादे यांना 'प्रिन्स ऑफ वेल्स' चा किताब देण्याचा ऐतिहासिक समारंभ, शहानशहाच्या हातून मोठ्या थाटाने व भपक्याने साजरा करण्यांत आला होता. हा किल्ला एका फारच खडबडीत डोंगराच्या कडप्यावर बांधलेला, चागला प्रेक्षणीय, चित्रासारखा दिसतो. तो फार भक्कम व मजबूत बांधलेला आहे. स्कॉटलंड, व आयर्लंडमधील नवे नवे व चमत्कारिक अनुभव घेऊन मी परत लंडनला आलो तेव्हां, वाटेत मला जसे काही स्वगृहींच परत जात असल्यासारखे वाटत होते. कारण, गेल्या काही महिन्यांच्या सहवासाने तेथील परिस्थिती व देखावे माझ्या निकट परिचयाचेसे झाले होते. 'रुग्बी,' 'यू' व अशाच उद्योगधंद्यामुळे गजबजलेल्या व मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे वाटणाऱ्या मोठमोठ्या गांवांवरून व उंचचउंच व प्रचंड चिमण्या आणि अफाट कारखाने, याच्या -मधून आगगाडी वेगाने लंडनच्या सभोवतालच्या २४८