पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश् लोक. इटी'ची स्थापना केली. या संस्थेने साऱ्या आयलंडभर जमीनीची लागवड सुधारण्याच्या कामी प्रयत्न करून, किती तरी यश मिळविले आहे. सन १८९२ साली. 'डब्लिन् कौंटी, सौंथ ' या प्रांतातर्फे ते पार्लमेंटमध्ये निवडून आले. तेथे त्यांनी आठ वर्षे सर्वांकडून मानमान्यता व लोकप्रिय-- पणा संपादन करीत काम केले. नेहमीं नानाप्रकारच्या कामाकाजांत गुंतलें असतांना व सारे आयुष्य काहींना कांहीं महत्त्वाचा उद्योग करण्यांत रत झाले असतांना देखील, ग्रंथलेखनाचे काम करण्यास त्यांनी फुरसत काढली आहे. त्यांचे 'आयलंड इन् धि न्यू सेंचरी'-नवयुगांतील आयर्लंड-हे पुस्तक फारच पसंत झालेले असून, त्यांतील मतें सर्वमान्य झाली आहेत. तसेच त्यांनी 'धि रूरल लाइफ प्रॉब्लेम् ऑफ धि युनायटेड स्टेट्स ' हे व दुसरीही पुस्तके लिहिली आहेत. ... त्यांचा निरोप घेऊन आम्ही होलीहेडला जाण्याला आगबोटीवर चढलों, व तेथून लंडनला परत आलो. वाटेत मला वेल्स देशाचे धूळदर्शन झाले. तो देखावा पाहून आनंद वाटला. हा देश विलायतेचा एक अंकित भाग बनल्याला काही शतके झाली तरी तो स्वतःला बऱ्याच अंशी अगदी स्वतंत्र समजतो, हे चमत्कारिक आहे. स्कॉटलंडप्रमाणेच या देशांतही पृथक् राष्ट्रीयत्वाचे विशिष्ट गुण कायम असलेले आढळतात. हा देश डोंगराळ असून तेथील हवा २४७