पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ण्यासाठी लंडनमधील 'जेन्नर' इन्स्टिटयूटलाही त्यांनी तितकीच रकम बक्षीस दिली आहे. या गोष्टी येथे नमूद करणे अवश्य आहे. डब्लिन्मध्ये असतांना आह्मी सर होरेस प्लंकेट यांच्या. भेटीला गेलो होतो. त्यांनी आमाला भोजनाला निमंत्रण दिले. त्यांचे 'किल्टराव-फाक्स्रॉक्' नांवाचे सुंदर घर समुद्रापासून जवळच आहे. ते फारच मजेदार असून हवा व प्रकाश, यांचा भरपूर पुरवठा होईल अशा रीतीने बांधलेले आहे. त्या प्रांतामध्ये ही जागा अव्वल प्रतीची आरोग्यदायक असल्याचे, त्यांनी सांगितले. सर होरेस साहेबांना संभाषणाची ढब सुरेख. साधलेली आहे. त्यांनी मला आयरिश् 'पार्लिमेंटेरियन्' मंडळीच्या बऱ्याचशा गमतीच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलेले 'आयरिश् बुल्लस्' चे चुटके फारच मनोरंजक होते. हे आमचे सुप्रसिद्ध यजमान सर होरेस साहेब फारच उत्तम स्वभावाचे होते. त्यांच्याबरोबर बोलण्याचालण्यांत माझा काळ मोठ्या आनंदांत व गमतीने गेला. सर होरेस यांचे आजवरचे चरित्र चमत्कारिक व संस्मरणीय झालेले आहे. ते पुष्कळ वर्षे अमेरिकेत 'क्याटल रांचिंग'-कुरणांमध्ये गुरे पैदा करून विकण्याचे काम करीत होते. नंतर शेतकरी लोकांमध्ये सहकारी संस्थांचा प्रचार करण्याचे काम त्यांनी हाती घेऊन, 'आयरिश अग्रिकल्चरल आर्गनायझेशन सोसा २४६