पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश लोक. दारूची घाण येत नव्हती. सर्व जागी विलक्षण स्वच्छता व टायटीप होती. तेथे सर्व बाबतीत दिसून येणारा सुव्यवस्थितपणा व काम करण्याची पद्धत, हे पाहिले असतां इंग्रज लोकांच्या अंगी उद्योगधंद्याच्या बाबतीत जी संघटनात्मक शक्ती वास करीत आहे तिचा चांगला अनुभव येतो. आह्मी नदीपर्यंत जाऊन आलो. तसेच 'माल्ट्'-दारू आंबविण्याची द्रव्ये ठेवण्याची जागाही पाहिली. येथे माल इतका कांहीं तयार होतो की, कारखान्याच्या निरनिराळ्या भागांतून त्याची नेआण करण्यासाठी, व तयार झालेला माल चोहीकडे पोहोचविण्याकरितां, एक लहानशी रेलवे लाईन घातलेली आहे. थोड्या वर्षांखाली लार्ड आयव्हे यांनी हा सारा कारखाना एका कंपनीला,पन्नास लक्ष पौंड (साडे सात कोटी रुपये)ला विकला. तेव्हां त्यांनी त्यांपैकी अडीच लक्ष पौंड (साडेसदतीस लक्ष रुपये गरीब लोकांना थोड्या भाड्याने देतां येण्या जोग्या चाळी बांधण्यासाठी दिले. त्यांतून पांचवा हिसा डब्लिन् येथे व बाकी लंडनमध्ये खर्च करण्याचे होते. तसेच त्यांनी डब्लिन् येथील सार्वजनिक आरोग्याला अपायकारक असा एक वस्तीचा भाग साफ करून, तेथे कामकांसाठी घरे, स्नानाच्या जागा. गायनालये, वगैरे बांधण्याकरितां तितकीच रकम दिली आहे. रोगप्रतिबंधक औषधोपचाराचा अभ्यास व नवीन शोध कर २४५