पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लेव्ही-चा समारंभ व हिंदुस्थानच्या व्हाइसरॉय साहेबांना साधारणत: करावी लागणारी बहुतेक इतर सरकारी कामें करीत असतात. या किल्ल्यांत प्रातिवार्षिक जे समारंभ होतात त्या संधीला डब्लिन् शहरी बरेच बाहेरचे लोक राहण्यास येतात आणि विशेषतः आगष्ट महिन्यांत जे घोड्यांचे प्रदर्शन होते त्यावेळी तर हा जनसंमद फारच वाढतो. या शहरांत दिसून येणाऱ्या प्रगतीचा व भरभराटीचा पुष्कळच भाग लॉर्ड आयव्हे यांच्या उत्साहयुक्त दीर्घ उद्योगाचे व औदार्याचे फल आहे. ते पूर्वी ' मेसर्स ग्विन्नेस आणि कंपनी' नांवाच्या प्रसिद्ध दारूच्या कारखान्याचे मुख्य होते. हा अफाट कारखाना पाहून येण्याची मला संधी मिळाली, व तो पाहून माझ्या मनावर फारच चांगला ग्रह झाला. हा कारखाना डब्लिन् येथील प्रसिद्ध स्थळांपैकी एक असून त्याला एखाद्या सार्वजनिक प्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असें ह्मणण्यास विशेष हरकत दिसत नाही. डब्लिन् शहर पाहण्यास येणारे बहुतेक लोक तो बुद्धया पाहण्यास जातात.अशा मंडळीसाठी 'वेटिंग रूम्स' बांधलेल्या असून कारखाना फिरून दाखवून आणण्यासाठी, एक 'गाईड'–वाटाड्या-नेमलेला आहे. दारू आंबण्याचे प्रचंड 'व्हॉट्स'-अजस्र पिपें-आम्ही पाहिली. दारू तयार करण्याचे पदार्थ आंबत होते त्या स्थळाखेरीज कोठेही, हा दारू गाळण्याचा कारखाना आहे असे कळून येण्याजोगी २४४