पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश लोक. आढळून आले. आयरिश् लोक एकंदरीत आनंदी स्वभावाचे व संसारक्रमांत चित्ताचा समतोलपणा ढळू न देणारे असे आहेत. या लोकांची स्थिती सामान्यतः गरीबीची असल्यामुळे, ते इंग्लिश लोकांइतपत महत्त्वाकांक्षी नाहीत. दूरदूरच्या भागांतले लोक मागसलेले व विशेष नरम व नम्र वाटतात. त्यांचे वर्तन गौरवाचे, तरी वरिष्ठ वर्गाशी कांहींसें भित्रेपणाचे व फाजील आदबीचे असते. या लोकांच्या अंगचे गुणदोष, हिंदुस्थानांत पुष्कळच मोठ्या प्रमाणावर आढळतात असे ह्मणतां येईल. आयर्लंडाची राजधानी — डब्लिन् ' येथे गेल्यावर आमची इकडची सफर पुरी झाली. लिफ्फे नदीच्या मुखाजवळ व डब्लिन्च्या सुंदर आखाताच्या शिरावर वसलेले हे शहर, खरोखरच शानदार दिसते. प्रेक्षणीय, सुंदर, व मोफत पाहता येण्याजोग्या ' पिक्चर ग्यालरीज'-चित्रप्रदर्शनशाळा-, पदार्थसंग्रहालय, सार्वजनिक ग्रंथालये, युनिव्हर्सिटी, आणि अगदी आधुनिक त-हेच्या म्युन्सिपालिटीला अवश्य अशा सर्व संस्था, तेथे आहेत. तेथील मोकळे व प्रशस्त चौक व सार्वजनिक बाग फार व्यवस्थित रीतीने राखलेले आहेत. सर्वांत महत्त्वाची व पाहण्याजोगी इमारत येथील 'क्यासल'-किल्ला-ही होय. तो मी जाऊन पाहिला.या किल्ल्यांत आयर्लंडचे व्हाइसराय साहेब रहातात आणि बादशहांचा प्रतिनिधी या नात्याने ते तेथेच सरकारी दरबार २४३