पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ज्यांना दानधर्म करण्याला पात्र ह्मणून ठरवितील, त्यांनाच दानधर्म केला जावा, अशी व्यवस्था सुरू करावी. असे झाल्याने या संबंधांतील अपव्यय बंद होईल, आणि याप्रमाणे झालेली बचत, दुसन्या चांगल्या कामांकडे लावता येईल. हल्ली काही थोड्या सत्पात्र लोकांना मदत मिळते. पण पुष्कळसा पैसा निवळ रिकामटेकड्या मंडळीवर व्यर्थ खर्च होत आहे. याच्यांत सुधारणा होण्याला पद्धतशीर काम व पक्की व्यवस्था अवश्य आहे. या बाबतींत समाजामध्ये योग्यायोग्याविषयी असावी तितकी खरी उमज नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सार्वजनिक हिताविषयी कळकळ क उत्सुकता यांची वाण असल्यामुळे, आपल्यांतील बऱ्या व वाईट गोष्टींसंबंधाच्या कल्पनांचा विपर्यास झालेला आहे. ही वाण भरून येईपर्यंत, सरळ मार्गाने व सचोटीने काम करणारे लोक मिळणार नाहीत. समाजाच्या हितासाठी वर निर्दिष्ट केल्यासारखी चळवळ अमलात आणण्यामध्ये प्रसंग पडल्यास दुलौकिकसुद्धां सहन करण्याला तयार, असे सार्वजनिक हिताप्रीत्यर्थ कळकळीने व उत्साहाने झटणारे लोक, पुढे येऊ लागतील तोच हिंदुस्थानाला सोन्याचा दिवस होईल. मी आयलंडाला जाऊन आलों, याचे मला फार समाधान वाटले. कारण, शेतकीसंबंधांत तेथील परिस्थिति पुष्कळ अंशी हिंदुस्थानांतल्या स्थितीसारखीच आहे, असे मला