पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश् लोक. करण्याच्या कामी ते नेहमी झटत असतात, एकंदरीत ते समाजहितदृष्टया फार महत्त्वाची, वरिष्ठ दर्जाची व उपयोगाची कामगिरी बजावितात. या संबंधांत हिंदुस्थानानें यूरोपाचें पूर्णपणे अनुकरण करावे असे मला मनापासून वाटते. ह्मणजेच आमच्याकडील बहुजनसमाजाची प्रगती व सुख समाधान, यांच्या बाबतींत खरोखर पुढे पाऊल टाकण्याची उमेद धरितां येईल. शिवाय, आयर्लंडामध्ये शिक्षणाचे काम पुष्कळ अंशी पाद्री लोकांच्या हाती असून ते त्याची सुधारणा करण्याला झटत आहेत. वास्तविकपणे ते लोक आपापल्या हद्दीतील समाजाची नैतिक, धार्मिक व ऐहिक, प्रगती घडवून आणण्याच्या कामी कोणचीही गोष्ट करण्यांत कसूर करीत नाहीतसे दिसते. दानधर्म व औदार्य, या संबंधांत विलायतेच्या लोकांच्या अंगच्या स्वभावांतील विशेष सुंदर गुणांविषयी विचार करीत असतांना मला एक विलक्षण कल्पना सुचली. हिंदुस्थानांत योगसाधनादिक शास्त्रोक्त मार्गाने चालणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी व त्यांच्या अभिवृद्धीप्रीत्यर्थ, ज्या त-हेनें दानवर्म केला जातो किंवा जावा, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु मला असे वाटते की, वरील हेतु साध्य करण्याकरितां आपण मंडळ्या स्थापन कराव्या व त्यांच्या मधून त्या त्या विषयांत निष्णात लोकांच्या कमेट्या नेमाव्या. त्या कमेट्या,