पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लोकांच्या धार्मिक, तसेंच व्यावहारिक कल्याणाकडेही लक्ष पुरवितात, व सहकारी पतपेढ्यांसारख्या संस्था चालू करण्यांत बरीचशी मदत देतात. असे बुद्धिमान् व वजनदार लोक या चळवळीमध्ये इतके मन:पूर्वक लक्ष देतात व परिश्रम करितात, यामुळेच आयलंडांत तिचा असा प्रसार होतो आहे. इकडे-- किंबहुना साऱ्या यूरोपभर-धार्मिक संस्थांशी संबंध असलेली धर्मगुरु मंडळी, हिंदुस्थानांतील त्या वर्गाच्या लोकांपेक्षा जास्त सुशिक्षित असते व त्यांच्याशी लोकही जास्त पूज्यबुद्धीचे व आदराचे वर्तन ठेवतात. आपापल्या हद्दीतील जनसमाजाच्या धार्मिक गरजांविषयी स्वतःवरील जबाबदारीची त्यांच्यामध्ये जास्त जाणीव व जागृती असते. तसेच उच्च प्रतीच्या नैतिक ध्येयांचे परिपालन करण्याच्या कामी निःसंशय त्यांचे अंगी अचाट शक्ति वसत असते. सार्वजनिक आर्थिक कल्याणाच्या कामाशीही त्यांचा अगदी निकट संबंध असतो. शारीर सुखसमाधानाच्या अभावी धार्मिकपणा व नैतिक वर्तन राहणे कठिण, ही गोष्ट इकडील पाद्री मंडळी पूर्णपणे अवगत आहे. इकडील पाद्री बहुतेक चांगले कुलीन व थोर घराण्यांतले असतात, तसेच त्यांचे नेतिक वर्तन वरिष्ठ प्रतीचे असते, असे सांगतात. ते साऱ्या जनसमाजाच्या सेवेत सादर राहण्याला झटतात. लोकही त्यांना चांगला मान देतात. ते गरीब लोकांचे वाली असून पुष्कळशा दानधर्माच्या योजना सुरू २४०