पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयरिश् लोक. त्याला सहानुभूति होती. आमचा पाहुणचार करण्यांत तो अत्यंत तत्पर होता. त्याच्या प्रेमळ व सौजन्याच्या वर्तनाबद्दल मी आभार प्रदर्शित करून संतोष झाल्याचे कळविलें. तेव्हा त्याने मार्मिक उत्तर दिले:, 'मी तुमच्याशी असभ्यपणाचे वर्तन केले तर हिंदुस्थानांत काय म्हणतील. ते तिकडे प्रसिद्ध झालें तर माझ्या देशाला खचित भूषणावह होणार नाही. ' 'कोणी आयरिश् गृहस्थ हिंदुस्थानांत गेला तर, हिंदी लोक त्याची अगदी घरच्यासारखी बरदास्त ठेवतील,' असेंही त्याने मटले. तेव्हां, हिंदी लोकांच्या स्वभावाच्या, त्याने केलेल्या या निदानाबद्दल, त्याच्या गुणग्राहकपणाची मी तारीफ केली. काही तरी उपाहार घेण्याविषयी त्याने आग्रहच धरिला. एकंदरीत तो 'फारच प्रेमळ व अगत्यवान दिसून आला. आपला मुलगा चांगला शिकला संवरलेला असून, त्याला शेतकरीच राहणे आवडत नाही, असेही त्याने सांगितले. हीच स्थिती इतर पुष्कळशा शेतकऱ्यांच्या मुलांची आहे. तो एनिस्कार्थी येथील एक जस्टिस ऑफ दि पीस' आहे. लौकरच त्याने एक टांगा जोडन स्वतः आम्हांला तेथील पायाकडे नेले. तेथील सहकारी पतपेढीचा तो पाद्री मूळ प्रवर्तक होता. माझ्याशी त्यांचे जे संभाषण झाले ते जसें चित्ताकर्षक तसेंच बोधप्रदही होते. धार्मिक परिस्थितीविषयी त्याच्या सांगण्यांत आले की, पाद्री लोक आपापल्या अधिकारांतील २३९