पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मिळविण्यासाठी इकडेही बारीकसारीक नाण्याला किंमत नाहीं असें नाही, हे उघड दिसत होते. आम्ही ग्लेन्मोर स्टेशनावर उतरलो. तेव्हां तेथें सणामुळे सर्वत्र सुट्टी होती. या देशांत नियमित दिवशी कोणच्या तरी संताच्या नांवाने सण व सुट्टी पाळण्याचा प्रघात आहे. त्या दिवशी बहुतेक सर्व कामकाज बंद राहतें. धार्मिक विधि व प्रार्थना आटपल्यावर लोक सारा दिवस, मजा मारतात व आराम करितात. म्हणून स्टेशनावर एकही वाहन आलेले नव्हते. आझांला मुक्कामावर नेऊन पोहोचविण्याला कोणी मिळेना. शेवटी तेथील परोपकारी स्टेशनमास्तराच्या रदबदलीने आमाला एक वाटाड्या मिळाला व आह्मी तेथून निघालो.वाटेत एक जमीनदार-शेतकरीभेटला. तो त्या वेळी आपल्या शेताच्या आवारांत शिरण्याच्या बेतात होता. त्याचे वय सुमारे ऐशी वर्षांवर असूनही तो धट्टाकट्टा व निरोगी दिसत होता. त्याच्याकडे जाऊन, आह्मीं त्याला एकादें वाहन मिळवून देण्याविषयी विचारिले. त्यावर, आपल्या तबेल्यांत कोणी असले तर मोठ्या खुषी तजवीज करितों, असें त्याने उत्तर दिले. त्याने आह्मांला घरांत बोलावून नेले. तेथे आह्मी त्याच्याशी बराच वेळ बोलत राहिलो. तो फारच योग्य व प्रेमळ स्वभावाचा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तो क्यालिफोर्नियामध्ये जाऊन आलेला होता. इंडियन लोकांविषयी २३८