पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग अठरावा. आयरिश लोक. एनिस्कार्थी येथे काही काळ आनंदांत काढल्यानंतर आली आगगाडीने ग्लेनमोरला गेलो. त्या दिवशी तेथील शर्यती होत्या. त्यासाठी रेलवेनें विशेष सवलती दिल्या होत्या. स्टेशनावर जो गोंधळ दृष्टीस पडला त्याजवरून इकडील रेलवेचा प्रवास हिंदुस्थानांतल्या इतकाच चांगला किंवा वाईट असल्याचे दिसून आले. इंग्लंडांत रेलवेचे अधिकारी व नोकर. यांचे वर्तन सभ्यपणाचे असते, व ते उतारूंना उपयोगी पडतात, आणि जनतेचे खरे नोकर असे वागतात. पण यावेळी ते हुकुमत गाजविणारे, स्वयंमन्य, व 'हम् करे सो कायदा,' असे समजणारे अरेराव दिसले. गाडीत फार गर्दी झाल्यामळे कांहीं उतारू एका पहिल्या क्लासाच्या डब्यांत बसले. पण त्यांना तेथून तात्काळ जोराने व बळजबरीने हुसकून लावण्यांत आले. आमच्या डब्यांतही तसेच काहीजण घुसलेले होते, त्यांना तेथेच राहू दिले. यावरून आगगाडीच्या प्रवासांत आराम २३७