पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आणि खेळ करमणुकीचे सुद्धां, जिन्नस, पुरवून घेता येतील, व स्वतः पुरती स्थानिक स्वराज्याचीही स्थापना करण्याचे उपाय शोधून काढता येतील. सारांश, सर्व त-हेच्या सामाजिक गरजांची पूर्तता, खऱ्या सहकारी तत्त्वाचे व परार्थनिरततेचें अवलंबन केल्याने होणारी आहे. अस्तु. हे एक सुरेख व सुंदर ध्येय आहे. ते साध्य असो वा नसो. तरी, ही चळवळ आजकाल मान्य झालेल्या व नियमित दिशेने सुद्धा, पुष्कळच उपयोगी व उत्तेजनार्ह आहे. तिच्या द्वारें खेडीपाडी व मध्यम वस्तीची शहरे यांच्या मधील राहणी, अधिक सुखकारक, भरभराटीची व समाधानाची होण्याचा बराच संभव आहे.