पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. आयलंडमधील सहकारी प्रत्यन. स्वतःमध्ये आणिले पाहिजेत.नुसते एका मंडळीचे नियम दुसरीला लागू करूनच भागत नाही. ते ज्यांना लागू व्हावयाचे, व ज्यांनी त्यांची अंमलबजावणी करावयाची, त्या दोघांकडूनही ते अक्षरशः पाळले गेले पाहिजेत. सहकारी पतपेढ्यांच्या कमेट्यांनी, आपले कर्तव्य निर्भयपणे व निर्भीडपणाने बजावलें पाहिजे. तसेच ऋणकोंनी कर्जाची फेड हप्तेबंदीने, नियमित वेळी व स्वतःच्या जबाबदारीची खरी जाणीव लक्षांत वागवून, करीत गेले पाहिजे. येथील लोकांच्या मनांत सहकारी तत्त्वाच्यासंबंधाने इतका कांहीं विश्वास पटलेला दिसतो की, त्यांच्या मते, भांडवलवाले व मजूर यांच्या मधील सतत चाललेला झगडा, वर्गावर्गातील भांडणे व राज्याराज्यांमधील देखील लढे वगैरे सर्व, ही तत्त्वे अधिकाधिक अमलांत येत गेली व व्यक्तिमात्राच्या नित्यव्यवद्वारालाही लागू झाली, तर त्यांच्या द्वारे झाडून बंद करतां येतील. काही लोकांच्या विचाराची तर या बाबतींत याहूनही पढ़ें धांव आहे. त्यांचे ह्मणणे असे आहे की, हे तत्त्व मानवजातीला अवश्य लागणाऱ्या वस्तूंची पैदास, पुरवठा, आणि विनिमय, इतक्या पुरतेच लागू करून थांबावयाचे काही कारण नाही. लहान लहानशा समाजाला सुद्धा, सहकारी तत्त्व अमलांत आणल्याने, पूर्णपणे स्वावलंबी होऊन, आपापल्या सर्व गरजा भागवून घेता येतील. स्वतःला लागणारे अन्नवस्त्रादिक, २३५