पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. निरनिराळ्या मंडळया व मेंबर लोकांच्या कमेट्यांनी चालविलेल्या इतर संस्था, यांच्या द्वारें, गरीब वर्गातील लोकांना सुद्धा आपापल्या खासगी व्यवहाराची व्यवस्था सार्वत्रिक हित साधेल अशा रीतीने करण्याची संवय पडलेली आहे. अशी भूमिका तयार असल्यामुळे तेथे सहकारी पतीच्या संस्थांच्या तत्त्वांचा कार्यक्रम अमलांत आणणे सोपें होतें. विलायतेंत, खेड्यापाड्यांत सुद्धां, ' ब्यांक्स'-पेट्या-आढळतात. आणि तेथील-विशेषतः खेड्यांतील-कारखाने व इतर धंदे यांची व्यवस्था खासगी लोकांच्या हाती असते. हिंदुस्थानांत या साऱ्याच गोष्टींची उणीव आहे. पेट्या, आणि समायिक भांडवलावर चालणाऱ्या व्यापारी संस्था फारच कमी, आणि नुकत्याच ज्या स्वदेशी ब्यांका बुडाल्या त्याचा परिणाम फारच नाउमेद करणारा आहे. सामान्यतः हिंदी लोकांमध्ये व्यवहारधंद्याची योग्यता, व्यापारांतील सचोटी आणि परप्रीतीचा उत्साह यांची वाण आहे. व्यापारी देवघेवींत येथून तेथून .“ व्यापारधंदा तो व्यापारधंदा ' हा अढळ मुद्रालेख अधिष्ठित झालेला दृष्टीस पडतो. हिंदुस्थानांत सहकारी चळवळ व पतपेढ्या, वगैरेंमध्ये म्हणण्यासारखी प्रगती व भरभराट होऊं लागण्यापूर्वी, तेथील सर्वसाधारण लोकसमाजाने, ब्रिटिश लोकांच्या अंगी असलेल्या उद्योगधंद्याच्या संवयी आणि सामाजिक हितैकदृष्टी, हे गुण २३४