पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. आयर्लंड व हिंदुस्थान यांच्यामधील परिस्थितीमध्ये वर वर पाहणाऱ्यास बरेचसे साम्य दिसते. दोन्ही देशांत जमीनदार लोक असून, कुळे जमीनीच्या मालकांना, जमी. नीचा फाळा देतात. आयर्लंडांतील · ग्याबिन,' ह्मणजे आमच्याकडील मारवाडी होत. लोकांच्या बेभरंवशामुळे, प्रारंभी या चळवळीला बराच त्रास पडला. पण या अविश्वासाचें लौकरच निर्मूलन झाले. नंतर जमीनीच्या मालकांचे औदासीन्य व शंका आड आल्या. याही अडचणी सुदैवाने आतां पुष्कळच कमी झाल्या असून त्यांच्यांतील बहुतेक मंडळी आतां उलट या चळवळीचे पुरस्कर्ते बनले आहेत. शेवटी तिला, दुकानदार व सावकार लोकांच्या वितुष्टाला तोंड द्यावे लागले. या सर्व स्थित्यंतरांतून ती संस्था पार पडून, आतां ती सर्वमान्य व सर्वथा लोकप्रिय, होण्याच्या राजमार्गाला लागली आहे. असे वाटते. हिंदुस्थानांत या बाबतींत, प्रगती झाली आहे. पण ती अर्थातच धिमेपणाची आहे. कारण, या प्रगतीला देशांत आधी शिक्षणाचा बराचसा प्रसार होण्याची आवश्यकता असते. इंग्रज लोकांच्या अंगी उद्योगधंद्याला अवश्य लागणारी योग्यता. व्यापारविषयक नीती व सचोटी, आणि आपली स्थिती सुधारण्याची इच्छा, हे गुण आहेत. पेढया व संयुक्त भांडवल जमवून व्यापार करणाऱ्या मंडळ्या, यांची व्यवस्था ते स्वतः दीर्व काळापासून पहात आले आहेत. तसेच, स्वावलंबनप्रवर्तक