पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. या पतपेढ्या कर्ज देतात किंवा नाही,याची आह्मी बुध्दया चौकशी करीत होतो. याविषयी मतभेद दिसला. तरी अशा कामासाठी कर्ज देण्याला, होणारा खर्च अवश्य आहे व तो उधळेपणाचा नाही अशी कमेटीची खात्री झाली तर, फारशी हरकत येणार नाही, असा एकंदरीत भाव दिसला. कर्जाची मुदतशीर फेड होण्याला फार कमी अडचण पडते, असेंही मला खात्रीपूर्वक सांगण्यात आले. या चळवळीला खात्रीने यश येण्याला पुढील गोष्टी अवश्य आहेत. कमेटीचे मेंबर निष्पक्षपाती व चांगल्या करारी स्वभावाचे पाहिजेत आणि केलेले करार दक्षतेने व इमानाने पाळण्याची इच्छा ठेवणाऱ्या व चांगल्या आचरणाच्या लोकांनाच कर्ज द्यावयाचे, असा त्यांच्या मनाचा निग्रह असला पाहिजे. या दोनीही गोष्टी इकडे सर्वमान्य व नेहमी प्रचारांत असल्याकारणाने या बाबतींत, हिंदुस्थानांत ज्या अडचणी येतात, त्यांचा इकडील मेंबर लोकांपाशी उल्लेख केला तर, आमचे झणणेच त्यांच्या लक्षात येत नाही. एन्निस्कार्थी येथे ही 'सोसाइटी' स्थापन झाली तेव्हां, मुख्य अडचण कर्ज काढणारी गि-हाइके मिळणे हीच होती. हिंदुस्थानांत याविषयी मुळीच उणीव भासणार नाही. कर्ज देणे घेणे, या विषयींच्या गोष्टी आयर्लंडामध्ये अगदी गुप्तपणे चालवितात. त्याची माहिती, ऋणको, त्याचे जामीनदार, व कमेटी, यांवांचून कोणालाही असत नाही. રરૂર