पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. शेतकीसंबंधी सहकारी कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत, लगतचेंच स्कॉटलंड व वेल्स, या देशांपेक्षां, आयर्लंड पुष्कळ पुढे गेलेले आहे. कदाचित्, तिकडे या चळवळीची, आयलंडा इतकी नड पडण्याजोगी आवश्यकता भासत नसेल. इंग्लंडांतील शेतवाड्या बहुतेक मोठाल्या असून, त्या मानाने लोकही सुखी आहेत. सहकारी पद्धत थोड्या उत्पन्नाच्या लोकांना जास्त फायद्याची होते. तिच्या योगाने कर्जाला तारणही चांगले मिळून त्यांचा सामान्यतः ज्या लोकांशी देवघेवीचा संबंध असतो, त्यांच्याकडून बऱ्याच जास्ती सवलतीने त्या लोकांना पैशाची मदत मिळवून घेता येते. खुद्द विलायतेंत सुद्धां, सरकार आणि सर्व विचारी लोक यांना या चळवळीचे. फायदे कळून चुकले आहेत. आणि या लोकांकडून व सर-. कारांतून मिळणाऱ्या उत्तेजनामुळे तिला चांगलाच जोर पोहोचतो आहे. सहकारी ' स्टोअर्स' व इतर शाखांप्रमाणेच, सहकारी पतपेढ्यांची तव्हाही, हळू हळू निस्संशय लोकप्रिय. होईल. आयलंडांतील सहकारी पतपेढ्या मोठ्याच सोईच्या व किफायतीच्या आहेत, इतकेच नव्हे, तर सहकारितत्त्वावर जिनसाची पैदास व खपही तेथें वाढत्या प्रमाणावर आहे.. खेड्यापाड्यांतून तर, सर्वच गोष्टी या सहकारी तत्त्वावर करण्याचा लोकांचा हेतू असल्याने त्याचे फार चांगले परिणाम खास व लौकर निदर्शनास येतील. बिनकिफायतीच्या उदाहरणार्थ लग्न कार्यासारख्या कामांसाठी २३१