पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पाहतां यावी ह्मणून आपल्या कार्यकारी कमेटीच्या एका बैठकीलाही हजर राहूं दिले. त्या कमेटीच्याही काही सभासदांबरोबर माझें जे बोलणे झाले, त्यावरून त्यांना या संबंधाची हिंदुस्थानांतील सद्यःस्थिति चांगलीच माहीत होती. हे पाहून मला समाधान व आश्चर्य वाटलें. - या सहकारी तत्त्वाच्या अनुरोधाने चालविलेल्या चळवळीच्या द्वारे 'आयर्लंडा'तील भावी स्थिती आशाजनक होईल, अशी तेथील वस्तुस्थितीचे लक्षपूर्वक निरीक्षण करणाऱ्या मंडळीला, खात्री वाटत आहे. तिच्या साहाय्याने गरीब उपरी कुळांना आपली स्थिती व स्वास्थ्य, भराभर सुधारण्याला सवड होत आहे. उदाहरणार्थ, अशा एखाद्या कुळाला एक लहानसें डुकर विकत घेण्याला लागणारी थोडीशी रकम उधार दिली जाते. थोडीशीच काळजी घेतल्याने ते चांगले पुष्ट व तयार करून बऱ्याच नफ्याने विकता येते. जमीनीची सुधारणा करण्याला. व यंत्रे विकत घेण्यालाही, हलक्याशा हप्तेबंदीने फेड करण्याच्या शर्तीवर, कर्ज मिळते. व कर्ज फेडून त्याला त्या वस्तूंचा मालक बनतां येते. ही सहकारी पद्धत, त्या देशांत कायम झाली तेव्हांपासूनच काय तो, शेतकामासाठी यांत्रिक शक्तीचा प्रसार शक्य झाला आहे. शिवाय, सरकारांतूनही कुळाला जमीनीचा मालक बनण्याला साहाय्य मिळत राहते. या दोन्ही गोष्टींमुळे तेथील स्थितीत फरक पडत चालला आहे, व यामुळे राष्ट्रीय भरभराट, हळू हळू पण एक सारखी होत आहे. २३०