पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. त्यांनी मंडळीला लागणारे, टांचणीपासून तो मळणीच्या यंत्रासुद्धां, हरएक जिन्नस पुरविणारी संस्था, स्थापन करण्याचे ठरविले. एनिस्कार्थी येथील 'स्टोअर्स'मध्ये, सामानाचा भरपूर पुरवठा आहे. तो 'स्टोअर्स' तेथील महत्त्वाच्या स्थळांत मोडला जातो. घरप्रपंचांत अवश्य लागणारे पदार्थ, शिवाय व्यवहारांत कामी येणारे पुष्कळसे चैनीचे जिन्नस सुद्धां, तेथे मिळतात. सर्व त-हेचे वाण सामान, रोटी, पोळ्या, मिठाई, लोणी, विणकरीचे व शिवलेले कपडे, निवडक बी, पिकाची वाढ करणारी खते, शेतकीची लहान मोठी आउतें व अवजारें, इत्यादि सर्व चिजा तेथे मिळतात. तसेच घोड्यांची जीने व साज नवे बनविणे व दुरुस्त करणे, याचीही तेथें शाखा आहे. तेथील काम करणारी मंडळी पक्की धंदेवाईक आहे. त्यांच्या कमेटीचा एक मेंबर, 'पाशा' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने काही दिवस ईजिप्त देशांत नोकरी केली होती. त्याच्याशी माझें थोडेसें संभाषण झाले. त्यावरून, त्याच्या नोकरीला हिंदुस्थानांत आरंभ झाला असल्यामुळे, त्याला तिकडीलही थोडीबहुत माहिती असल्याचे कळून आले. असले लोक आमच्या हिंदुस्थानांत हवे आहेत. तरच तिकडे सहकारी संस्थांची, नांव घेण्यासारखी व खरी, प्रगती होण्याची उमेद बाळगतां येईल. या 'सोसाईटी'च्या 'कमेटी'च्या दुसऱ्या कांही मेंबरांशीही या संबंधांत माझें बोलणे झाले. त्यांनी मला, त्यांची काम करण्याची तव्हा प्रत्यक्ष २२९