पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. या वर्षी या चळवळीकडे विशेष लक्ष दिले जात होतें.मी आयर्लडला जाण्याच्या थोडेच पूर्वी,कानडा व अमेरिकेतील संयुक्त संस्थाने येथील बरेचसे कमिशनर लोक, नुकतेच युरोपांत सफर करण्याला निघालेले होते. या चळवळीची कार्यकर्तृकता, त्यांतही विशेषतः सहकारी पतपेढ्यांच्या कार्यक्रमाच्या पद्धती, यासंबंधी स्थानिक चौकशी करण्याच्या उद्देशानेच ही सफर बुद्ध्या चालली होती. त्यांच्या बरोबरच मी आयलंडला जाण्याला तयार आहे काय, असे मला विचारण्यांत आले होते. तसे करणे बरेंच उपयोगी व फायदेशीर झाले असते. पण इतर कार्यक्रमामुळे मला ते साध्य नव्हते. त्याला माझा निरुपाय होता. एन्निस्कार्थी येथील पद्धतीविषयी चौकशी करण्यासाठी, कांहीं स्कोच मंडळीही नुकतीच येऊन गेली होती, असेंही मला कळले. ही लहानशी व विशेष पुढे न सरसावलेली जागा, आपली अशा रीतीने अवचित प्रसिद्धी झालेली पाहण्याला जणों एकदम जागी झाली होती. ही सहकारी संस्थेची चळवळ, खेडेगांवात, लोकांच्या जीवनक्रमामध्ये बरीचशी गडबड व जोम उत्पन्न करण्याला चांगलीच साधनीभूत झाली आहे, यांत शंका नाही. एकदा एनिस्कार्थी येथील सहकारी पतवर्धक संस्थेच्या मेंबरांची कमेटी, काम करण्याला जमली असतांना, त्यांना शाईची एक बाटली हवी होती. ती एका दुकानदाराने दिली नाही. त्यावरून ૨૨૮