पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयलंडमधील सहकारी प्रयत्न. आनंद होत होता, हे उघड होते. आयरिश् मुले व मुली भेकड, मागे मागे घेणारी, व शिक्षकाविषयीं भय बाळगणारी दिसली. मी हे वर्णन अर्थात तेथील प्राथमिक शाळांचे देत आहे तथापि त्या शाळेतील सामानसुमान व अवश्य लागणारे पदार्थ, यांचा पुरवठा, हिंदुस्थानांतील दुय्यम प्रतीच्या उत्तमोत्तम शाळेतल्या बरोबरीचा होता. एनिस्कार्थी येथे माझा वेळ-त्यांतही तेथील 'कोआपरेटिव्ह स्टोअर्स' पाहण्याला गेलो होतो तेव्हांचा फारच मजेत व उपयुक्त माहिती मिळविण्यांत गेला. हे इ.स.१९१३ साल सहकारी संस्थांच्या ज्युबिलीचे होते. हे लक्षात ठेवण्याजोगें आहे. सार्वजनिक सुधारणा व प्रगति घडवून आणण्याच्या कामी या संस्था बऱ्याच महत्त्वाच्या कार्यसाधक झाल्या आहेत. सहकारी पतपढ्यांची तन्हा त्यांच्यापासूनच उदयास आली, असें म्हणता येईल. अगदी गरिबीच्या प्रारंभापासून गेल्या पन्नास वर्षांत, ही चळवळ कशी फैलावत गेली याची कल्पना, ती आज साऱ्या विलायतभर सर्वांत मोठी औद्योगिक संस्था आणि सर्व जगांत कामकरी वर्गाला मुख्य उमेदीचे व भरंवशाचे मुख्य साधन झाली आहे, यावरून करता येईल. या सोसाईटीची देवघेव पहिल्या वर्षी थोड्याशा पौंडांचीच होती. ती हल्ली, तीन कोटी पौड-पंचेचाळीस कोटी रुपये झाली आहे. यावरूनही तिची उपयुक्तता व महत्त्व पूर्णपणे सिद्ध होते. २२७