पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. सोसाइटी'-सहकारी संस्थे–चा स्थानिक सेक्रेटरी एक नोकरी पुरी झालेला शाळामास्तर असून तो फार हुषार आहे. त्याला शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याविषयी भारी कळकळ आहे. या संस्थेच्या संबंधी सर्व प्रश्नांचे त्याला पूर्ण ज्ञान आहे. या कामा-- विषयी त्याला जसा भारी उत्साह, तदनुरूपच कार्यकर्तत्व शक्तीही त्याच्या अंगी आहे. ही योग्य स्थळी योग्य माणसाची योजना जुळलेली आहे. पूर्वी त्याचा शिष्य असलेला एक गृहस्थ अमेरिकेत जाऊन राहिला आहे. त्याचे एक पत्र त्यानें,अर्थातच समाधानाने व आनंदानें, मला दाखविले. त्यांत स्वतःचे कुशलवृत्त व हल्लींची स्थिती यांजबद्दल लिहून, त्याने काही सल्लाही विचारली होती. त्यावरून त्या शिक्षकाच्या शिक्षणाचा कायम टिकणारा प्रभाव, व शिष्याच्या मनांत उत्पन्न झालेला दृढः विश्वास, यांची उत्कृष्ट साक्ष पटत होती. . डामिटी येथील एक शाळा पाहण्यास मी गेलो.. तेथील स्थितीवरूनशिक्षण संबंधांत इंग्लंड व आयलंड यांमध्ये असलेला पुष्कळच फरक माझ्या तेव्हांच लक्षात आला. आयरिश् शाळा, आजकालच्या मानाने, किती तरी मागसलेल्या स्थितीत आहेत, अशी माझी समजूत झाली. इग्लंडांत, मुलें हुषार, तरतरीत, मोकळ्या मनाची, व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याला उत्सुक दिसत होती. यावरून, मिळत असलेल्या शिक्षणापासून त्यांना, २२६