पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. परिणाम घडेल. हे म्हणणे खरे किंवा खोटें हें निश्चयाने सांगतां येत नाही. जिकडे तिकडे हा भारी महत्त्वाचा होऊ घातलेला फेरबदल याच्या विषयीं, फारच जोराचा मतभेद असून, याच राजकीय गोष्टीविषयीं सारखा वादविवाद ऐकू येतो. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून इकडील बहुजनसमाज, 'होम रूल'ला प्रतिकूळ आहे, अशीच माझी समजूत झाली आहे. राजकीय परिस्थितीच्या या अनिश्चितपणामुळे, औद्योगिक संस्थांच्या भांडवलाच्या भागांची किंमत उतरत चालली आहे, असे सां-गतात. कोणच्या प्रकारे का होईना, याचा कायमचा निकाल लौकर लागून गेलेला बरा, अशी अंतःकरणपूर्वक भावना -सर्वत्र दिसून येते. असे झाल्याने इंग्लंड व आयर्लंड दोहोंनाही एकदांचा उसंत मिळेल. बेलफास्टहून डंडाक् व ड्रामिंटीला जातांना, आझाला आयर्लंडमधील अतिउंच पर्वत व सष्टिसौंदर्याचा उत्तम देखावा पाहण्यास सांपडला. साऱ्या खोऱ्यांमध्ये घरें दिसत होती. इंग्लंड व स्कॉटलंडमधील घरांच्या मानाने ती लहान व हलकी दिसली. शेते व वाड्याही लहान व कमी प्रतीच्या होत्या तरी हिंदुस्थानांतल्या मानाने ती सर्व अधिक भरभराटींतच होती. ड्रामिटींमध्ये सहकारी संस्थांची चांगलीच प्रगती पाहून समाधान मानण्याला जागा होती. तेथील 'कोआपरेटिव्ह २२५