पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. अशा एका कारखान्यांत जाऊन, हे सर्व काम आम्ही नीटपणे पाहिले. येथील तागाचा कपडा पृथ्वीभर प्रसिद्ध आहे. बेलफास्टचा परदेशाशी व्यापार चालतो तो, फारच मोठा, डब्लिन्च्या व्यापारापेक्षाही भारी आहे. कारण, या कारखान्यांशिवाय, तेथें गोणपाट विणणे व दोरखंडे वळणे यांचे आणि तंबाकूचेही प्रचंड कारखाने आहेत. हे शहर मुख्यतः व्यापार धंदा व उद्योग, यांचे केंद्र आहे. तरी तेथे शेतकीकडेही चांगलेच लक्ष दिले जाते. यावेळी तेथें एक औद्योगिक प्रदर्शन चालू होते. ते आमी पाहिले.शेतकीशी संबंध असलेल्या उद्योगधंद्याची सरकारांतून व्यवस्था लागण्याच्या हेतूने हे मुरू केलेले होते. सारी संपदा व उद्योगधंदे यांचा मूळाधार जमीन. त्या अर्थी ही योजना बरीच उमेदीची आहे. या दिशेने जें पुढे पाऊल पडते आहे तें, पुढे मागें हितकारी परिणाम उत्पन्न करण्याच्या दिशेनेच पडत आहे, ह्मणावयाचे. या आयर्लंड देशांतील राज्यकारभाराची तहा कोणत्या पद्धतीवर कायम व्हावी, या विषयींची, फारा दिवसांपासून लांबणीवर पडत आलेली चळवळ, व तिचा अनिश्चितपणा, यांच्यामुळे, व्यापारधंद्याला बराच चंचलपणा आलेला आहे. काही काही ठिकाणी असें निश्चयाने ह्मणतात की, 'होम रूल'स्थानिक स्वराज्य-देण्यांत आले तर, कारखाने बंद होतील किंवा त्यांचे स्थलांतर होईल. निदान त्यांच्यावर पुष्कळ अनिष्ट २२४